July 21, 2025
fe4aa093-97aa-45bc-b91c-2d3145a7ee9c

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) 

वाळूज महानगर ; एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या विशेष कारवाईत ८ मोबाईल फोन, १ दुचाकी असा एकूण २.६० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, १ आरोपीस अटक करण्यात आली आहे.

दि १८ जुलै  रोजी फिर्यादी संतोष सुप्रभ रणगवमे यांनी त्यांच्या मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील संशयित आरोपी विकी जाधव रा शांतीनगर रांजणगाव शेपू अटक केली.

तपासादरम्यान आरोपीकडून ८ मोबाईल फोन (सुमारे १.८० लाख ₹ किंमतीचे) आणि एक दुचाकी (MH-20 GS 3377) असा एकूण २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मोबाईल चोरी करून त्यांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम अंमलदार सूरज अग्रवाल, सुरज भुसे, जालिंदर वाखुरे यांनी केली.

॰॰॰


error: Content is protected !!