
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून रोज सभा, बैठकांचा धडाका सुरू आहे. काल जय भवानी चौकात मंत्री संजय सिरसाठ यांनी शिवसेनेकडून लढणाऱ्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतली होती.
त्या पार्श्वभूमीवर आज, दि. २ फेब्रुवारी रोजी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांची मोहटादेवी परिसरातील शिवस्मारक येथे सायंकाळी ठीक ६ वाजता भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे बजाजनगर परिसरातील राजकीय हालचालींना अधिक वेग आला असून पंकजाताई मुंडे या सभेत काय भूमिका मांडणार, कोणते मुद्दे उपस्थित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप पुरस्कृत उमेदवार सचिन गरड यांच्यासह लक्ष्मण लांढे व अश्विनी गवळी यांनी केले आहे. भाजपकडून या सभेला मोठे महत्त्व दिले जात असून सभेच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्ते तयारीत गुंतले आहेत.
दरम्यान, या सभेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
….
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 7 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 13 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


