
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून वाळूज महानगर परिसरात वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीला शिवसेना–भाजप युती जाहीर करण्यात आली होती; मात्र काही तासांतच ही युती तुटल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, बजाजनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांनी कार्यालयाचे उद्घाटन करताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आमची दिशाभूल करून आमच्यासोबत दगाबाजी करण्यात आली, असा आरोप मंत्री सावे यांनी केला होता. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावर पालकमंत्री संजय शिरसाठ आज काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर आज दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बजाजनगर येथील जयभवानी चौकात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पालकमंत्री संजय शिरसाठ सावे यांच्या आरोपांवर खुलासा करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाळूज महानगरात भाजप, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत असून प्रचार अधिक तीव्र होत चालला आहे. आजची सभा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
॰॰॰
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



