
वाळूज : वडगाव कोल्हाटी गट क्रमांक ७२ येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून अखंड भक्तिभावात सुरू असलेल्या श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याची आज दिमाखदार सांगता पार पडली. श्रीगुरूंच्या कृपाशिर्वादाने २५१ सेवेकऱ्यांनी निष्ठेने व भक्तिभावाने पारायण वाचन पूर्ण करून सेवा अर्पण केली.
सांगता सोहळ्यावेळी परिसरातील असंख्य स्वामीभक्त, महिलावर्ग व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत केंद्र परिसर ‘जय स्वामी समर्थ’ च्या घोषणांनी दुमदुमून गेला. सर्व उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान श्री उमेश दुधाट पाटील यांनी भावनिक साद घालत केंद्र उभारणीसाठी सढळ हाताने सहकार्य करण्याचे आवाहन केले. “ही सेवा म्हणजे स्वामी चरणी अर्पण केलेली कृतज्ञतेची भावना आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पावन सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी सेवेकरी मंडळ उमेश दुधाट पाटील सुरेश जी कोकाटे एम. आर. मुके शिवाजी माकोडे राजाभाऊ कोकाट अमोल पाचपांडे, संतोष पाटील, सुनील शेवकर
आणि महिला सेवेकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी श्री सुरेश जी कोकाटे यांनी उपस्थित सर्व भक्तांचे आभार मानत पुढील भक्तीपर उपक्रमांसाठी केंद्र सदैव तत्पर राहील, असा विश्वास व्यक्त केला.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


