Screenshot
व्यापारी गंभीर जखमी; वाळूज परिसरात भीतीचे वातावरण

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव फाटा परिसरात रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवत सोनाराकडील साडेपाच तोळे (सुमारे ५५ ग्रॅम) सोने लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेत व्यापारी गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आनंद सूर्यवंशी (वय ३५, रा. सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांचे रांजणगाव शेणपुंजी येथे गेल्या आठ वर्षांपासून सोन्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सूर्यवंशी यांनी साडेआठ वाजता दुकान बंद करून दुचाकीवरून घरी निघाले होते. रांजणगाव फाटा परिसरात पोहोचताच पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले व त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

सूर्यवंशी यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे काही अंतरावर जाऊन पुन्हा परत आले. यावेळी चोरट्यांनी बंदुकीच्या मागील टोकाने त्यांच्या डोक्यात मारहाण केल्याने सूर्यवंशी खाली कोसळले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या जवळील सोन्याची बॅग लुटून घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर सूर्यवंशी यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. रविवारी (दि. २६) सकाळी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
⸻
काही तासांत दोन घटना; उद्योजक व व्यापारी चिंतेत
विशेष म्हणजे, पोलिस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर ही गंभीर घटना घडली आहे. याच परिसरातील तिरंगा चौकात सकाळी जॉन वाईन शॉप फोडून लाखोंची रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या १२ तासांत दुसरी मोठी लूट झाल्याने उद्योजक व व्यापारी वर्गात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे.
•••••••••
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


