
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : रेल्वे स्टेशन परिसरातून रांजणगाव शेपू येथे येत असलेल्या एका रिक्षाला गोलवाडी फाटा येथे मध्यरात्री भीषण अपघात झाला. रस्त्यालगत उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला रिक्षा जोरात धडकल्याने या अपघातात रिक्षाचालकासह एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात रिक्षाचालक रईस हाशिम शेख (वय ३५, रा. रांजणगाव शेपू) व प्रवासी महिला रुखमिनी येणगे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शीतल मोरे (वय २४) व पायल वरदे (वय १९), दोघीही शिवनेरी कॉलोनी, रांजणगाव शेपू, ता. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. रिक्षामध्ये अडकलेल्या जखमी महिलांना बाहेर काढण्यासाठी कटरच्या सहाय्याने रिक्षा कापावी लागली. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा येथील अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या अपघातामुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


