
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : वाळूज महानगरात मंगळवारी (दि. २०) दुपारी संभाव्य हिट अँड रनची घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली. मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या चालकाने एएस क्लब चौकात ट्रक आडवा उभा केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. या प्रकरणी ट्रक चालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
अहिल्यानगर महामार्गावरील एएस क्लब चौकातील ट्रॅफिक सिग्नलवर दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एमएच १४ डीएम ७७१६ क्रमांकाचा भंगाराने भरलेला ट्रक चुकीच्या दिशेने वळवताना आढळून आला. वाहतूक निरीक्षक राजेश यादव, पीएसआय शिरसाट तसेच पोलिस कर्मचारी सुनील चव्हाण, परसुवाळे व तुपे यांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला.
चौकशीदरम्यान ट्रक चालक बप्पासाहेब शेषराव लकडे (वय ३२, रा. खामगाव, ता. बीड) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, त्याचा मित्र अनिल भाऊसाहेब नवले (वय २९, रा. लांजी, ता. गंगापूर) हा एमएच २० ईपी ९८२० क्रमांकाच्या मोटारसायकलवर घटनास्थळी आला व पोलिसांशी वाद घालत चालकाला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला.

याच वेळी मद्यधुंद चालकाने ट्रक पुन्हा सुरू करून तो थेट चौकाच्या मध्यभागी उभा केल्याने एकच गोंधळ उडाला व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पोलिसांनी तत्काळ ट्रक ताब्यात घेत क्रेनच्या सहाय्याने तो बाजूला केला. अल्कोहोल चाचणीत चालकाने मद्यसेवन केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात ट्रक चालक बप्पासाहेब लकडे व त्याचा साथीदार अनिल नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अपघात टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
॰॰॰
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



