
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : संदीप लोखंडे
वाळूज महानगर : तिसगाव चौफुली परिसरात गुरुवार सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास ऑडी कार आणि ऊसाने भरलेल्या महिंद्रा बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऑडी कार चालक गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जयेश राठोड व कृष्णा चव्हाण हे चिकलठाणा येथून चाळीसगावकडे ऊसाने भरलेली महिंद्रा बोलेरो (एम.एच. १५ जे.सी. ३१०१) घेऊन जात होते. तिसगाव चौफुली जवळ गाडी पंचर झाल्याने त्यांनी बोलेरो रस्त्याच्या कडेला उभी केली होती.

दरम्यान, सकाळी सुमारे ८ वाजता भरधाव वेगाने आलेली ऑडी कार (एम.एच. ०२ डी.एम. ५५८८) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोलेरो गाडीवर जोरात आदळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की ऑडी कारने बोलेरो गाडीला जवळपास १०० फूट पुढे ढकलले.
या अपघातात ऑडी कार चालक गंभीर जखमी झाला असून कारमधील दोन्ही एअरबॅग उघडल्या आहेत. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
००००००००००००
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


