
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
MIDC सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून एक आरोपी अटकेत आहे.

दि. १४ जानेवारी २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रोझोन मॉल समोरील रोडलगत सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने शहरातील विविध भागांतून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख फारूक शेख इस्माईल (वय ४८ वर्षे, रा. अजिन कॉलनी, नरगाव, छ. संभाजीनगर) असे आहे. आरोपीकडून Hero HF Deluxe, Honda Shine, Honda Dream Yuga, Activa, Pleasure आदी कंपन्यांच्या एकूण १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २२२/२०२५, भादंवि कलम ३०३(२), ३४(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. शहरातील इतर मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपासही पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC सिडको पोलिसांच्या विशेष पथकाने केली.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५
-
Share Total Views: 5 बजाजनगरातील जिवघेणा हल्यातील तीन आरोपी पोलसांकडून अटक; फायरिंगचाही झाला होता प्रयत्न
-
Share Total Views: 4 Share
-
पेट्रोल-डिझेलवर निर्बंध; फक्त ठराविक रकमेपर्यंतच इंधन मिळणार
Share Total Views: 4 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल व अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे
