
ग्राहक गंभीर जखमी; एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात चौकशी सुरू
वाळूज (प्रतिनिधी) – एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाजनगर येथील मोरे चौकात असलेल्या एका खानावळीतील हॉटेल चालकांनी ग्राहकावर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संबंधित ग्राहक युवक गंभीर जखमी झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास दोन युवक नाश्ता व चहा घेण्यासाठी सदर हॉटेलमध्ये आले होते. यावेळी हॉटेल चालक आणि ग्राहक यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.
या दरम्यान हॉटेलचा वृद्ध चालक तसेच चहाच्या टपरीचा चालक असलेला त्याचा नातेवाईक युवक यांनी एकत्रितपणे एका ग्राहक युवकाला हॉटेलसमोरच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. डोक्यावर जोरदार फटका बसल्याने ग्राहक युवक गंभीर जखमी झाला.
जखमी युवकास तातडीने जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी शहरातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मारहाण करणाऱ्या हॉटेल चालकासह त्याच्या नातेवाईक युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, रुग्णालयातून वैद्यकीय कायदेशीर अहवाल (एमएलसी) अद्याप प्राप्त न झाल्याने बातमी लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करत आहेत.
॰॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


