न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे)

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे)
छत्रपती संभाजीनगर :राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५ ठरवण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी, वेबसाईटवरील वाढलेला ताण आणि मोठ्या संख्येने महिलांची e-KYC प्रलंबित असल्याने महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी e-KYC ची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
🌐 शासनाचा मोठा निर्णय
राज्यात गेल्या काही दिवसांत आलेल्या नैसर्गिक आपत्ती व विविध अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना e-KYC वेळेत पूर्ण करता आली नाही. या परिस्थितीची दखल घेत शासनाने अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
📝 पात्र महिलांसाठी विशेष सूचना
ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, किंवा घटस्फोट झालेले आहेत त्यांनी—
स्वतःचे e-KYC पूर्ण करावे, मृत्यू प्रमाणपत्र / घटस्फोट प्रमाणपत्र / मा. न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी.

📢 मंत्री अदिती तटकरे यांचे वक्तव्य
‘‘मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘लाडकी बहीण’ योजना अत्यंत यशस्वीपणे राबवली जात आहे. अनेक भगिनींच्या अडचणी समजून घेऊन e-KYC ची अंतिम तारीख ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. ज्या भगिनींनी अजून e-KYC केलेले नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी,’’ असे मंत्री तटकरे म्हणाल्या.
या निर्णयामुळे लाभधारकांना योजनेंतर्गत मिळणारा मासिक लाभ अखंडित राहणार असून उर्वरित महिलांना निर्धारित मुदतीत e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
॰॰॰॰॰
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


