Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : वाळूज परिसरातील साजापूर येथे भंगार व्यावसायिकांच्या गोदामाला अचानक आग लागून अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी (दि. ११ जानेवारी) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, साजापूर येथील गट क्रमांक ५४ मधील भूखंड क्रमांक ११० येथे भंगार व्यावसायिकांचे गोदाम आहे. या गोदामातील भंगार साहित्याला अचानक आग लागली. आगीमुळे प्लास्टिक साहित्य, पाईप, पत्रे, लाकडी फळ्या आदी साहित्य जळून खाक झाले. तसेच गोदामाशेजारी उभ्या असलेल्या लोडिंग वाहनालाही (एमएच-४५ टी-०५६६) आगीचा फटका बसला.
आगीची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले एक चारचाकी वाहन अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नाने सुरक्षितपणे वाचवले. मात्र भंगार साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन कर्मचारी :
अनिल देशमुख, एल. जी. ब्राह्मणकर, सुनील पाटील, आर. जे. जाट, एच. एस. पाटील, पी. एस. खाडे, पी. आर. नागरगोजे, एस. एम. महाले, एस. एम. कांडे आदींनी शर्थीचे प्रयत्न केले.
…..
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 7 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 13 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


