August 2, 2025
1fbd7bc0-b739-4344-a2ae-8dae6378766f

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे
वाळूज महानगर | दि. २३ जुलै २०२५

प्रतिष्ठित दैनिकाच्या पत्रकारावर प्रताप चौक येथे दुचाकीने जोरदार धडक देत हुज्जत घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. २० रोजी सायंकाळी घडली. पत्रकार कार्यालयातील काम आटपून घरी जात असताना, प्रताप चौक परिसरात त्यांना पाठीमागून विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर पत्रकाराने त्यांना समजावून सांगितले, मात्र आरोपी अधिक आक्रमक होत अश्लील शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यांनी अंगावरही धाव घेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणात आरोपी धायडे (पूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही) रा. रांजणगाव शेणपूंजी आणि त्याचे दोन साथीदार यांच्याविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह:
या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सदर आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून होत आहे.

॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!