Screenshot

वाळूज (प्रतिनिधी):
बजाज नगर व सिडको परिसरातील नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधा, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी सातत्याने संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भास्करराव वर्पे हे जनतेच्या प्रश्नांचा खरा आवाज म्हणून ओळखले जात आहेत. सामान्य कार्यकर्ता असूनही त्यांनी सिडको प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या आहेत.
ऐन कोविड काळात सिडकोचे आरोग्य केंद्र बंद करण्यात आल्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या गंभीर बाबीच्या विरोधात सिडको व एमजीएम प्रशासनाविरोधात दत्तात्रय वर्पे यांनी थेट दशक्रिया विधी आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला होता. या आंदोलनाची मोठी दखल घेत प्रशासनाला दुसऱ्याच दिवशी सिडको आरोग्य केंद्र सुरू करावे लागले होते. हे आंदोलन परिसरात विशेष लक्षवेधी ठरले होते. आजही सिडको व गट नंबर परिसरातील हजारो नागरिक या आरोग्य केंद्राचा लाभ घेत आहेत.
आरोग्य सेवा ही नागरिकांची मूलभूत गरज मानून दत्तात्रय वर्पे हे परिसरात सर्वाधिक मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करत असतात. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वारंवार आरोग्य शिबिरे होत असून आजपर्यंत हजारो नागरिकांनी या सेवेचा मोफत लाभ घेतला आहे. अनेक नागरिक त्यांना या कार्यासाठी धन्यवाद देत आहेत.

बजाज नगर परिसरातील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर दत्तात्रय वर्पे यांनी मोठे आंदोलन छेडले होते. या आंदोलनामुळे सिडको प्रशासन अडचणीत आले होते. प्रशासनाने दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने त्यांनी सिडको कार्यालयासमोर प्रतिकारक आंदोलन केले. त्यानंतरही प्रश्न कायम राहिल्याने त्यांनी सिडको कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल थेट मंत्रालय स्तरावर घेण्यात आली होती.
परिसरात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागाकडून उपाययोजना करून घेत समस्या मार्गी लावली. तसेच सिडको प्रशासनाकडून रस्त्यावरील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने दत्तात्रय वर्पे यांनी थेट कचरा सिडको कार्यालयासमोर नेऊन ठेवत आंदोलन केले होते. यानंतर सिडको प्रशासनाने तातडीने दखल घेत परिसरातील साफसफाई केली.
दरम्यान, आगामी पंचायत समिती गण क्रमांक १०० च्या निवडणुकीत दत्तात्रय वर्पे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होणार असून ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा नेता म्हणून दत्तात्रय वर्पे यांची ओळख असून त्यांच्या कार्यामुळे परिसरात त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
….॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


