
संभाजीनगर | प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट क्रमांक ५१ मधून शिवसेना पक्षाचे उमेदवार हनुमान जगन्नाथ भोंडवे यांच्या प्रचाराला आज सकाळी जोरदार सुरुवात झाली. प्रचार रॅलीसह डोअर-टू-डोअर प्रचार अभियान सुरू करण्यात आले असून या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज सकाळी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत महिला मतदारांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. ही प्रचार रॅली सारा संगम, सारा आकृती, अण्णाभाऊ साठे चौक, गट नंबर ४८, बजाजनगर परिसरातून काढण्यात आली. त्यानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत शिवसेनेचे चिन्ह व भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवली.

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात येणारा बजाजनगर–वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद गट क्रमांक ५१ असल्याने या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवण्यात येत असल्याने शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
या प्रचार रॅलीत जिल्हा परिषद उमेदवार हनुमान जगन्नाथ भोंडवे, पंचायत समिती उमेदवार बाळासाहेब वाल्मीक गाढे, पंचायत समिती उमेदवार रत्नमाला शशिकांत ढमढेरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उषाताई हांडे, श्रीकांत साळे, गणेश भोंडवे, प्रियंका घोरपडे, सुरेखा लगड, मीनाक्षी भोंडवे, कांता चव्हाण, मंदा भोकरे, कमल सागडे, मंदाकिनी चेळेकर, छाया शेळके, अलका दौड, रावसाहेब शिंदे, गोरख शेळके, विनोद कदम, अशोक लगड, देविदास जाधव, हरिश्चंद्र जगताप, योगेश साळे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष मतदार सहभागी झाले होते.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा गट क्रमांक ५१ मध्ये प्रचार अधिक तीव्र होत असून शिवसेनेच्या प्रचाराला नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
॰॰॰॰॰॰
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



