February 4, 2026
1001864786

MIDC वाळूज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाई

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/ वाळूज महानगर

शस्त्राचा धाक दाखवून गावात दहशत माजवणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाने अटक करून जेरबंद केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी नाना भिवसन गुंडाळे यांनी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी हा फिर्यादीच्या सुनेस बोलत असताना आढळून आल्याने त्यास जाब विचारला असता, आरोपीने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या हातावर वार केला व घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकास आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोउनि. प्रविण पाथरकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला.

दरम्यान, आरोपी आंबेलहोळ–कासोडा रोड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीस MIDC वाळूज पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.

या कारवाईत पोअं. सुरेश भिसे, नितीन इनामे, हनुमान ठोके, राजाराम वाघ, समाधान पाटील, संदीप तागड, रोहित चिधळे व वैभव गायकवाड यांचा सहभाग होता.

फरार आरोपीस जेरबंद केल्याने परिसरात दिलास्याचे वातावरण असून, पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

——————–


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!