वाळूज एमआयडीसी परिसरातील भीषण अपघात

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : सोलापूर–धुळे महामार्गावर वाळूज एमआयडीसी परिसरात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत भीषण घटना घडली. तनवाणी कॉलेजसमोर रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला.
या दुर्घटनेत अनुसया चव्हाण (वय ४२) व वंदना चव्हाण (वय ३२) या दोघींचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी रक्त व मांसाचा सडा पडला होता. सायंकाळची वेळ असल्याने तसेच महामार्गावर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे परिसरात अंधाराचे वातावरण होते.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश यादव, पोलिस उपनिरीक्षक शंकर शिरसाट, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद आबूज, तसेच पोलिस अंमलदार प्रकाश वाघ, शिवाजी गायकवाड व बनसोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जखमी अवस्थेत दोन्ही महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, घटनास्थळी चारचाकी वाहनाचे काही भाग आढळून आले आहेत. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


