
वाळूज महानगर : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने गट नंबर परिसरातील ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलमध्ये जिजाऊ जन्मोत्सव सोहळा अतिशय दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेचे संचालक श्री. उमेश दुधाट पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी “जय जिजाऊ, जय शिवराय” असा जयघोष करत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. कार्यक्रमाची सुरुवात गट नंबर परिसरातून प्रभातफेरी काढून करण्यात आली. या प्रभातफेरीद्वारे विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या कार्याची, विचारांची व संस्कारांची माहिती घरोघरी पोहोचवली. त्यामुळे परिसरात प्रेरणादायी व उत्साही वातावरण निर्माण झाले.

यानंतर शिवराणा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून तसेच माँ साहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
शिवराणा चौक येथील कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी नृत्य व नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून माँ साहेब जिजाऊ यांच्या महान कार्याचा प्रभावी परिचय उपस्थित नागरिकांना करून दिला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून मोठी दाद मिळाली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता शिवले यांच्यासह सौ. गीतांजली राऊत, शीतल शेंडे, सौ. सविता सूर्यवंशी व कविता उचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
…
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


