Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, स्पष्ट वक्ते व कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने दोन दिवसांचा राज्यस्तरीय दुखवटा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमात बदल केला आहे.
दुखवट्याच्या कालावधीत उमेदवारांना प्रचार करणे शक्य नसल्याने, प्रचारासाठी दोन दिवसांची वाढ देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यानुसार, पूर्वी दि. ५ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. तसेच जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
हा सुधारीत निवडणूक कार्यक्रम मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहितीही आयोगाने स्पष्ट केली आहे.
॰॰॰॰
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



