February 4, 2026
Screenshot

Screenshot



न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज (छत्रपती संभाजीनगर) :


जुन्या भांडणाच्या कारणावरून वडगाव कोल्हाटी येथील शिवाजीनगर परिसरात चौघांनी मिळून एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अर्जुन काशिनाथ जाधव (वय ३८, व्यवसाय – माती काम, रा. शिवाजीनगर, वडगाव कोल्हाटी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश दुबे, पिंटू दुबे, धनंजय पांडे व अभिषेक पांडे (सर्व रा. वडगाव कोल्हाटी) हे फिर्यादीच्या घराजवळ आले.


आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करत हाताने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोपी पिंटू दुबे याने फिर्यादी अर्जुन जाधव यांच्या डोक्यावर, कमरेवर व दंडावर लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा भाऊ सतीश जाधव यालाही उजव्या हाताच्या दंडावर लोखंडी पाईपने मारून जखमी करण्यात आले.
या घटनेप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!