Screenshot

सोनखेड गाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील ललिता सुरेश सोनवणे या २०२१ पासून आतापर्यंत सरपंच पदावर कार्यरत आहेत. उच्च शिक्षित असलेल्या ललिता सोनवणे यांनी सरपंच पदाची सूत्रे स्वीकारताच गावाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले.
सरपंच झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला. नळ पाणीपुरवठा योजना राबवून प्रत्येक वाडीत नळ बसवण्यात आले. गावातील दलित वस्तीमध्ये शासकीय योजनेअंतर्गत पक्की घरे उपलब्ध करून दिली, तसेच त्या परिसरात रस्ते व इतर मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या.

गावाच्या सुरक्षितता व उजेडासाठी हायमास्ट लाईट बसवण्यात आले. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत १ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज शाळा इमारत व क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक विकासाला चालना मिळाली.
स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी प्रभावी कामगिरी केली. गावात स्वच्छ शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देत व्यापक जनजागृती केली. याच कामगिरीमुळे ग्रामपंचायतीला ‘हागणदारी मुक्त गाव’ पुरस्कार मिळवून देण्यात यश आले.
ललिता सोनवणे यांनी स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता मोहीम, मोफत पाणी योजना अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. याशिवाय भूमिगत गटार योजना, अतिक्रमण मुक्त गाव, सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक ग्रंथालय, दलित वस्तीत रस्ते, वयस्कर नागरिकांना चादरी वाटप, विविध आरोग्य सुविधा, तसेच वृक्ष लागवड असे अनेक विकासात्मक उपक्रम राबवले.
ग्रामविकास अधिक प्रभावी व्हावा यासाठी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन ग्रामविकासाचा अभ्यास केला, आणि त्यातील चांगल्या संकल्पना सोनखेड गावात प्रत्यक्षात उतरवल्या. त्यांच्या कामाची दखल घेत विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोनखेड गावाला भेट देऊन सकारात्मक अभिप्राय नोंदवला आहे.
या सर्व अनुभवाच्या बळावर आता ललिता सोनवणे या छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, बजाजनगर येथील गट क्रमांक ५० मधून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत.
इतर उमेदवारांच्या तुलनेत त्या उच्चशिक्षित, अनुभवी आणि कामाचा ठोस अनुभव असलेल्या उमेदवार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे बजाजनगर परिसराचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे घडेल, अशी ठाम अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
••••••
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


