Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने जात असताना शाळेच्या बसने अचानक वळण घेतल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह त्याचा मुलगा जखमी झाल्याची घटना २७ डिसेंबर रोजी सिडको महानगर-१ अंतर्गत तिसगाव चौफुलीजवळ घडली. या प्रकरणी तब्बल १५ दिवसांनंतर, दिनांक १२ जानेवारी रोजी संबंधित बस चालकावर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता दीपक सूर्यभान जाधव (वय ४५, रा. तिसगाव) हे आपला मुलगा तन्मय याला शाळेत सोडण्यासाठी दुचाकी (क्रमांक एमएच-२० सीएल-०१८२) वरून निघाले होते. वडगाव–तिसगाव रोडवरील साई गगन लॉन्ससमोर आले असता, बस क्रमांक एमएच-२० सिटी-१७०५ ने अचानक वळण घेतल्याने दुचाकीला- बसमध्ये अपघात झाला.
या अपघातात दीपक जाधव व त्यांचा ७ वर्षाचा मुलगा तन्मय हे दोघेही जखमी झाले. अपघात होताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या बाळू देवरे व आप्पासाहेब डोंगरे यांनी जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी जखमी दीपक जाधव यांच्या फिर्यादीवरून संबंधित बस चालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
॰॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


