
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : बजाज नगर, वाळूज येथील ऑर्चिड इंग्लिश स्कूल संघाने १७ व्या आंतरशालेय व्हेरॉक टी-२० करंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. दिनांक ११ जानेवारी रोजी गरवारे मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात वुडरिज हायस्कूलने ऑर्चिड इंग्लिश स्कूलवर ६ गडी राखून विजय मिळवत व्हेरॉक टी-२० करंडकावर आपले नाव कोरले.

रविवारी सायंकाळी झालेल्या अंतिम लढतीत ऑर्चिड इंग्लिश स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मधल्या फळीतील अभिषेक घटविसावे याने केलेल्या ३० धावांच्या खेळीच्या जोरावर ऑर्चिड संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १०६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या वुडरिज हायस्कूल संघाने सलामीवीर समरवीर पाटील याच्या ३३ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर ११ षटकांत ४ गडी गमावून १०९ धावा करत सामना ६ गडी राखून जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल समरवीर पाटील याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
विजयी व उपविजेता संघांना आयुक्त अंजली रमेश, व्हेरॉक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सतीश मांडे व राहुल टेकाळे यांच्या हस्ते चषक व बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी स्पर्धा समिती सदस्य अनंत नेरळकर, दिनेश कुंटे, प्रदीप राठोड, सय्यद जमशेद, मच्छिंद्र जाधव आदी उपस्थित होते. अंतिम सामन्याचे धावते समालोचन अॅड. श्याम देशमुख व अमृत बिऱ्हाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पूजा करवा यांनी केले.
१७ व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या ऑर्चिड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन संघास ९५ हजार रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ऑर्चिड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमधील विद्यार्थी केवळ क्रीडाक्षेत्रातच नव्हे तर NEET, JEE (Main/Advance), CA Foundation, NTSE, MTSE शिष्यवृत्ती, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा आदी विविध स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवत आहेत.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


