
वाळूज महानगर : आज सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बजाज नगर येथील भूमिपुत्र सामाजिक सस्थेच्या मैदानावर राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.
या कार्यक्रमास भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अजून आदमाने पाटील, पोपटराव अधिक पाटील, भाऊसाहेब डमाळे, रमेश शेळके, काकासाहेब चेळेकर, आसाराम पाटील कर्फे, कैलास कदम, साहेबराव पाथ्रीकर, संजय महिंद्रा, रामदास शेठ पैठण पगारे, विजय जाधव, संजय पेरे, विनायक नारखेडे आदींसह इतर सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव केला. समाजप्रबोधन व राष्ट्रउभारणीसाठी जिजाऊ माँसाहेबांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडला.
॰॰॰॰
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



