Screenshot
दोन संशयित ताब्यात; पुढील तपास गुजरात पोलिसांकडून सुरू…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : गुजरात येथील एका ट्रान्सपोर्टच्या साड्यांनी भरलेला ट्रक चालकाने परस्पर पसार करून तो थेट वाळूज एमआयडीसी परिसरातील अंबेलोहळ येथील एका व्यावसायिकाकडे उतरविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुजरात पोलिसांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने अंबेलोहळ येथे धाड टाकत चोरीचा संपूर्ण माल जप्त केला असून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथील मुकेश जैन यांचे ‘सुयोग ट्रान्सपोर्ट’ नावाने ट्रान्सपोर्ट आहे. दिनांक १९ जानेवारी रोजी सुमारे ४५ लाख रुपये किमतीच्या साड्यांनी भरलेला ट्रक नियोजित ठिकाणी पाठविण्यात आला होता. मात्र हा ट्रक २२ जानेवारीपर्यंत पोहोचला नाही. ट्रक चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने ट्रान्सपोर्ट मालकांना संशय आला. त्यानंतर २३ जानेवारी रोजी गुजरात येथे अज्ञात चालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान गुजरात पोलिसांना हा ट्रक थेट वाळूज एमआयडीसी परिसरातील अंबेलोहळ येथे आणून एका भंगार गोदामात माल उतरविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार २५ जानेवारी रोजी गुजरात पोलीस व वाळूज एमआयडीसी पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत अंबेलोहळ येथील संबंधित गोदाम व एका घरावर छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात साड्यांचा साठा आढळून आला.
पोलिसांनी हा संपूर्ण चोरीचा माल जप्त केला असून या प्रकरणाशी संबंधित दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुजरात पोलीस करत आहेत.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


