
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ✍️ संदीप लोखंडे
वाळुज महानगर :
दिवाळी सणानिमित्त वाळुज MIDC पोलीस ठाणे हद्दीत अनेक कामगार, तसेच उद्योगपती आपल्या गावी जात असल्याने दरवर्षी या काळात घरफोडी व दरोड्याच्या घटना वाढतात. या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-1, छत्रपती संभाजीनगर यांच्या संकल्पनेतून “Anti-Dacoity Patrolling” हा नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे.

हा उपक्रम दिनांक 20 ऑक्टोबर 2025 पासून 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू असून, त्याअंतर्गत रात्री 11.00 वाजेपासून पहाटे 4.00 वाजेपर्यंत पोलीस पथके गावागावांत पायी गस्त घालणार आहेत.
या मोहिमेत R.C.P. पथकाचे 24 कमांडो, डांगरी गणवेशातील जवान, तसेच पोलीस ठाणे MIDC वाळुज येथील डी.बी. पथकातील 2 अधिकारी व 10 अंमलदार सहभागी आहेत. विशेषतः घरफोडी किंवा दरोडा पडलेल्या विरळ वस्ती आणि लांब अंतरावरील गावे — आंबेलोहोळ, नांदेडा, कासोडा, विटावा, टोकी, आंबेगाव, आसेगाव, साजापुर, पंढरपूर, रांजणगाव, जोगेश्वरी, एकलहेरा, नारायणपूर — या भागात रात्री पायी गस्त घालण्यात येत आहे.

पहिल्याच दिवशी या पथकाने टोकी, आंबेलोहोळ, एकलहेरा, आंबेगाव, साजापुर, बजाजनगर, सिडको महानगर या भागात प्रभावी पेट्रोलिंग केली. गस्तीदरम्यान गावातील पोलीस पाटीलांचाही सहभाग राहणार असून, रात्री विनाकारण फिरणाऱ्या संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
पोलिसांचे आवाहन आहे की —
👉 नागरिकांनी रात्री अनावश्यक घराबाहेर फिरणे टाळावे.
👉 गावात अथवा परिसरात संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा.
👉 पोलिस यंत्रणा सदैव नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे.
हा उपक्रम मा. पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, मा. पोलीस उप आयुक्त श्री. पंकज अतुलकर, सहा. पोलीस आयुक्त (छावणी विभाग) श्री. संजय सानप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, श्रेणी उपनिरीक्षक दिनेश बन, पोह. धीरज काबलीये, पोह. सुरेश कचे, पोअं. सुरेश भिसे, पोअं. संदीप तागड, पोअं. शिवनारायण नागरे, पोअं. रवि गायकवाड, पोअं. हनुमान ठोके, पोअं. संतोष बमनाथ, पोअं. दीपक जाधव, सचिन ठोकळ, तसेच आरसीपी पथक प्रमुख पोह. भगवान डोईफोडे व 24 कमांडो यांनी सहभाग नोंदविला आहे.
- पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीलाShare Total Views: 962 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
- आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्नShare Total Views: 15 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके) छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन
- NEET पेपरफुटी प्रकरणांवर केंद्र सरकारचा मोठा निर्णयShare Total Views: 10 फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
- आषाढी एकादशीनिमित्त वाळूज-पंढरपूर परिसरात वाहतुकीचे विशेष नियोजनShare Total Views: 578 २५ जुलैपर्यंत अनेक मार्गांवर निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
- भरधाव कारची उभी कंटेनरला धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यूShare Total Views: 379 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील





