
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : मी आमदार झाल्यापासून बजाज नगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. येत्या काळात बजाज नगरला हायटेक करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी जिल्हा परिषद गट क्रमांक ५१ मधील उमेदवार हनुमान भोंडवे तसेच पंचायत समितीचे उमेदवार मोहिनी ढमढेरे आणि बाळासाहेब गाडे यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन राज्याचे न्याय व सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केले.

बजाज नगर येथे शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिरसाठ म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून बजाज नगर परिसरात रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सोसायट्यांमधील अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. शिवस्मारकाचे काम पूर्ण करण्यात आले असून मोहटा देवी मंदिराजवळ सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. वडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारण्यात आला आहे.

पुढील टप्प्यात बजाज नगरला हायटेक करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते, दोन्ही बाजूंनी पथदिवे, तसेच कामगार बांधवांसाठी मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत मजबूत नेतृत्व आवश्यक असून त्यासाठी हनुमान भोंडवे, मोहिनी ढमढेरे आणि बाळासाहेब गाडे यांना मतदारांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी महापौर त्रिंबक तुपे, नगरसेवक गिरजाराम हळनोर, जिल्हा परिषद उमेदवार हनुमान जगन्नाथ भोंडवे, पंचायत समिती उमेदवार बाळासाहेब वाल्मीक गाडे व रत्नमाला शशिकांत ढमढेरे यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि शेकडो महिला व पुरुष मतदार उपस्थित होते.
॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


