
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांनंतर आता सायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विविध सोसायट्यांमध्ये भरदिवसा सायकली चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिक तक्रार दाखल करत नसल्यामुळे चोरट्यांचे मनोबल अधिक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
अशीच एक सायकल चोरीची घटना वडगाव–तिसगाव रोडवरील सिडको वाळूज महानगर परिसरातील साई रेजन्सी सोसायटीत घडली असून, या घटनेत सायकल चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश कचकुरे हे आपल्या कुटुंबासह साई रेजन्सी सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. दि. १४ जानेवारी रोजी त्यांच्या मुलाने नेहमीप्रमाणे फ्लॅटसमोर सायकल लावली होती. मात्र काही वेळानंतर सायकल लावलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. परिसरात शोध घेतला असता सायकल कुठेही सापडली नाही.
त्यानंतर सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, एका अनोळखी व्यक्तीने दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सायकल चालवत नेत चोरी केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. सदर प्रकार लक्षात येताच गणेश कचकुरे यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला असून, परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
•••••••••••
-
“चांदगुडे कुटुंबाची घटना ताजी असतानाच खवडा डोंगरावर पुन्हा धोकादायक प्रकार!”
Share Total Views: 18 ३० ऑगस्टला पुन्हा एक व्यक्ती धोकादायक कड्यावर; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
-
शाळेतून घरी निघाली अन् काळाने गाठले; वाळूच्या हायवाने ८ वर्षीय विद्यार्थिनीचा घेतला जीव!
Share Total Views: 369 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८
-
खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!
Share Total Views: 20 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना



