
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मधील विद्यार्थ्यांनी शालेय विभागीय ज्युदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदकांचा पाऊस पाडला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या विभागीय ज्युदो स्पर्धेत ऑर्किड समूहातील विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजवले.
सुवर्णपदक विजेते विद्यार्थी:
आराध्या जाधव व सुवर्ण दातरंगे (Under-14, ऑर्किड इंग्लिश स्कूल) गौरी पांचाल (Under-17, ऑर्किड इंग्लिश स्कूल) संस्कृती चौधरी (Under-14, ऑर्किड टेक्नो स्कूल) श्रुतकीर्ती खलाटे (Under-17, ऑर्किड टेक्नो स्कूल) राजश्री चिकने व धनश्री चिकने (Under-19, ऑर्किड ज्युनिअर कॉलेज)
या सर्व विद्यार्थिनींची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झालेली असून, त्यांनी संस्थेचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.
ऑर्किड ग्रुपचे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा, NEET, JEE (Main/Advance), CA Foundation, NTSE, MTSE Scholarship, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, तसेच नवोदय विद्यालय परीक्षा अशा अनेक स्पर्धांमध्येही उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व पालक यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बजाजनगरातून क्रीडाक्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या ऑर्किड समूहाच्या विद्यार्थ्यांबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
- लाडक्या पत्नीचाच रौद्रावतार! फोन कॉलच्या वादातून नवऱ्यावर चाकू हल्लाShare Total Views: 10 छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर
- ऑर्किड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे MHT-CET परीक्षेत घवघवीत यशShare Total Views: 21 वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) बजाजनगर,
- ESIC रुग्णाकडून अवैध पैसे उकळल्याचा आरोप; हॉस्पिटलने आरोप फेटाळले…Share Total Views: 65 छत्रपती संभाजीनगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज
- रूम भाड्याच्या वादातून तरुणाची आत्महत्या; रूम मालकासह तिघांविरोधात गुन्हाShare Total Views: 109 वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) वाळूज
- पोलिसांची भीती दाखवून सामान्य नागरिकांकडून पैशांची उकळपट्टी? वाळूज एमआयडीसीतील ‘झिरो पोलिस’ पुन्हा सक्रिय असल्याची चर्चाShare Total Views: 59 वाळूज महानगर | प्रतिनिधी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वतःला पोलिसांशी





