
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा – संदीप लोखंडे
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीसारख्या मोठ्या सणातही बजाजनगर परिसरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग कायम असल्याने नागरिकांच्या नाराजीचा भडका उडाला आहे. या परिसरात कचऱ्याची समस्या ही नवीन नाही; गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी साचलेला कचरा नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, वारंवार एमआयडीसी प्रशासनाला विनंती करूनही या समस्येकडे दुर्लक्षच होत आहे. प्रशासनाने महिंद्रा कंपनीला कचरा व्यवस्थापनाचा ठेका दिला असला तरी रस्त्यावरील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दिवाळीसारख्या स्वच्छतेच्या आणि आनंदाच्या काळातसुद्धा ठिकठिकाणी वाढणारे कचऱ्याचे ढीग परिसरातील सौंदर्य बिघडवत असून दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना विरोध करायला सुरुवात केली असून यामुळे काही ठिकाणी किरकोळ वादांच्याही घटना घडल्या आहेत.
नागरिकांनी एमआयडीसी प्रशासनाकडे तात्काळ कारवाई करून रस्त्यावरील कचऱ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याची मागणी पुन्हा केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही रहिवाशांनी दिला आहे.
…
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


