हेरॉक क्रिकेट : प्रेम कासुरे पुन्हा सामनावीर

व्न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) :
छत्रपती संभाजीनगर : व्हेरॉक उद्योग समूहातर्फे आयोजित १७व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनने दमदार विजयांची मालिका कायम ठेवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रेम कासुरेने उत्कृष्ट सर्वांगीण खेळी करत सामनावीराचा किताब पटकावला.
ऑर्किड ग्रुप आणि गायकवाड ग्लोबल स्कूल यांच्यातील सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. गायकवाड ग्लोबल स्कूलचा डाव १७.१ षटकात केवळ ७२ धावांत गुंडाळल्यानंतर, ऑर्किड ग्रुपने अवघ्या ४.५ षटकात बिनबाद ७२ धावा करत दहा विकेटने भेदक विजय मिळवला.
स्वयंम वाघमारेने १५ चेंडूत ४० धावा ठोकत (१ चौकार, ५ षटकार) संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रेम कासुरेने १६ चेंडूत २८ धावा (५ चौकार, १ षटकार) तर तन्मयने दोन चौकारांसह १२ धावा जोडल्या. गोलंदाजीत प्रेम कासुरेने १० धावांत ३ विकेट घेत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. साईराज आखाडे (२/२५) आणि अभिषेक घटविसवे (२/२०) यांनीही भेदक मारा कायम ठेवला.
यापूर्वी झालेल्या सामनातही ऑर्किड स्कूलने राजा शिवाजी विद्यालयावर एकतर्फी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करत त्यांनी २० षटकांत एक बाद २०० धावांचा भक्कम डोंगर उभारला. त्या सामन्यातही प्रेम कासुरे सामनावीर ठरला होता.
ऑर्किड ग्रुपची सातत्यपूर्ण कामगिरी आणि प्रेम कासुरेचा फॉर्म पाहता स्पर्धेत त्यांची विजयी घोडदौड अधिक वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
॰॰॰॰॰
- खवड्या डोंगरावर पोलिस ‘ॲक्शन मोड’वर; तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा, आता उपाययोजनांना वेग!Share Total Views: 11 पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह अधिकाऱ्यांची रात्री घटनास्थळी पाहणी; भविष्यातील दुर्घटना
- मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू! एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू Share Total Views: 6 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :वाळूज महानगर तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन उडी
- बजाजनगरात महिलेच्या गळ्यातील ३.४० लाखांची सोन्याची चैन लंपासShare Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर मुलीच्या वाढदिवसासाठी केक घेऊन स्कुटीवरून
- वाळूज महानगरात अंकित वैद्य यांचा ‘गेम चेंजर’ सेमिनार; सराफ व्यावसायिकांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शनShare Total Views: 26 छत्रपती संभाजीनगर | वाळूज महानगर परिसरातील सराफ व्यावसायिकांसाठी आज, ९ ऑगस्ट
- पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीलाShare Total Views: 1,087 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी





