Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
वाळुज महानगर – बजाजनगर परिसरात नंग्या तलवारी हातात घेऊन दुचाकीवर ट्रिपल सीट फिरत दहशत माजवून तरुणावर तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (9 जानेवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खवड्या डोंगर परिसरातून अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पैशाच्या जुन्या वादातून मधुकर रामा भालेराव (वय 35, रा. एसटी कॉलनी, बजाजनगर) याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गुरुवारी (8 जानेवारी) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तीन आरोपींनी बजाजनगर परिसरात तसेच महाराणा प्रताप चौकात हातात तलवार व लाकडी दांडे घेऊन दुचाकीवर ट्रिपल सीट फेरफटका मारला. गर्दीच्या ठिकाणी दहशत निर्माण करत आरोपींनी मधुकर भालेराव याच्यावर तलवारीने वार करून त्याला जखमी केले. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा केल्यानंतर आरोपी बराच वेळ बजाजनगर परिसरात नंगी तलवार घेऊन फिरत होते. त्यानंतर रात्री खवड्या डोंगर येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादीच्या घरासमोर जाऊन पुन्हा धमकी देत ते मनमाडच्या दिशेने पळून गेले. पोलिसांचा माग काढू नये म्हणून आरोपींनी मोबाईल फोन बंद ठेवले होते.
दरम्यान, फरार आरोपी सायंकाळी खवड्या डोंगर परिसरात येणार असल्याची माहिती वाळुज एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचण्यात आला. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तीन जण पायी खवड्या डोंगराकडे जाताना दिसताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपी वेगवेगळ्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाही पोलिसांनी सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ऋषीकेश उर्फ मारी शालीक सोनवणे (वय 19), प्रकाश रमेश गायकवाड (वय 25) व अभिजीत किशोर फाटे (वय 22) अशी असून सर्वजण रा. वडगाव (कोल्हाटी), ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील आहेत.
⸻
ही कामगिरी केली
पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, प्रविण पाथरकर, पोलीस हवालदार अरुण उगले, अविनाश ढगे, राजाराम वाघ, सुरेश भिसे तसेच पोलीस अंमलदार नितीन ईनामे, समाधान पाटील, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, संदीप तागड, रोहित चिंचाळे, शिवनारायण नागरे यांनी ही यशस्वी कारवाई केली.
॰॰॰॰॰॰॰॰
-
पानटपरीचे कुलूप तोडून सिगारेटचा मोठा साठा चोरीला
Share Total Views: 1,063 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर बजाजनगर येथील लोकमान्य चौक मोहटादेवी
-
आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रती पंढरपूर येथे विठुरायाची महापूजा संपन्न
Share Total Views: 16 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :(अनिकेत घोडके) छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन
-
NEET पेपरफुटी प्रकरणांवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Share Total Views: 11 फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :



