Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे एका ३८ वर्षीय कामगारास गंभीर दुखापत झाल्याची घटना रांजणगाव शेपू येथे आज बुधवार (दि. १४ जानेवारी) दुपारी घडली. रवी वामन काजळे (३८) (रा. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव शेपू) असे जखमी कामगाराचे नाव आहे.
रवी काजळे हे दुचाकीवरून कामावरून घरी जात असताना अचानक त्यांच्या चेहऱ्यावर नायलॉन मांजा अडकला. या घटनेत त्यांच्या नाकासह डोळ्याला गंभीर इजा झाली. घटनेनंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असतानाही अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुचाकी चालकांनी वाहन सावकाश चालवावे तसेच नायलॉन मांजापासून स्वतःची सुरक्षितता राखण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांनी याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


