
भाच्यासह मित्राविरोधात गुन्हा; वावी पोलिसांच्या तपासात धक्कादायक उलगडा
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : पैशांच्या व्यवहारातून २६ वर्षीय विवाहितेचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहिरीत फेकल्याचा, तसेच तिच्या अवघ्या १४ महिन्यांच्या मुलालाही वाहत्या पाण्यात जिवंत फेकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिच्या चुलत भावासह त्याच्या मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वावी व वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायमा सलमान चौधरी (वय २६) हिचा विवाह २०२० मध्ये झाला होता. काही काळ ती पतीसोबत पुण्यात राहत होती. त्यानंतर ती साजापूर येथे वास्तव्यास होती. तिला साजीम नावाचा १४ महिन्यांचा मुलगा होता.
१ एप्रिल २०२६ रोजी सायमा मुलाला घेऊन घरातून बाहेर पडली. ती पतीकडे पुण्याला गेल्याचे कुटुंबीयांना वाटत होते. मात्र, चौकशीअंती ती पुण्याला पोहोचली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १९ मे रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
तपासादरम्यान सायमाच्या घरात सुमारे तीन लाख रुपये बँकेत जमा केल्याच्या तसेच ५० हजार रुपयांच्या ऑनलाइन व्यवहाराच्या पावत्या आढळल्या. संबंधित खाते तिच्या चुलत भावाचे नुरजमा अहमद चौधरी याचे असल्याचे निष्पन्न झाले. या अनुषंगाने चौकशी सुरू असताना फिर्यादीनुसार नुरजमाच्या वडिलांनी धक्कादायक माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, नुरजमा अहमद चौधरी व त्याचा मित्र सद्दाम उर्फ आमीर अहमद चौधरी यांनी पैशांच्या बहाण्याने सायमाला पंढरपूर (वाळूज एमआयडीसी परिसर) येथे बोलावले. तेथे कारमध्ये बसवून ओढणीने तिचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कणकोरी शिवारातील विहिरीत फेकल्याचा आरोप आहे. तसेच तिच्या १४ महिन्यांच्या मुलालाही पुण्याकडे जाताना एखाद्या नदी-नाल्यात वाहत्या पाण्यात जिवंत फेकल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी संशयितांना सोबत घेऊन घटनास्थळाचा शोध घेतला असता, वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी आढळलेल्या एका अनोळखी महिलेच्या मृतदेहाची माहिती समोर आली. मृतदेहावरील कपडे, नथ, घड्याळ तसेच स्नॅपचॅटवरील छायाचित्रांतील पोशाख यांच्या आधारे संबंधित मृतदेह सायमाचाच असल्याची ओळख फिर्यादी व तिच्या पतीने पटवून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी नुरजमा अहमद चौधरी (सध्या रा. पुणे) व सद्दाम उर्फ आमीर अहमद चौधरी (रा. साजापूर) यांच्याविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वावी व वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
॰॰॰॰॰॰॰
-
पैशांच्या वादातून विवाहितेचा गळा आवळून खून; १४ महिन्यांच्या चिमुकल्यालाही वाहत्या पाण्यात फेकले…
Share Total Views: 3 भाच्यासह मित्राविरोधात गुन्हा; वावी पोलिसांच्या तपासात धक्कादायक उलगडा छत्रपती संभाजीनगर |
-
सिडको महानगरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे मिनी गंठण लंपास
Share Total Views: 590 पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या मैदानात चोरट्याचा धाडसी प्रकार; एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा
-
हतनूर–रुईखेडा चिखलमय रस्त्यामुळे रुग्णाला बैलगाडीतून नेण्याची वेळ; पावसात मुलाची जीवाची कसरत
Share Total Views: 1,265 न्युज मराठवाडा वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर



