
NEWS MARATHWADA | SANDEEP LOKHANDE
छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहरातील सातारा परिसरातील चाटे स्कूल रोड येथील ‘मे. क्लिफ ऑल डे डायनिंग बेस्पोक हॉस्पिटॅलिटी एलएलपी’ या हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. Safe Food Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, प्रशासनाच्या आदेशानुसार हॉटेलमधील अन्न उत्पादन, प्रक्रिया, विक्री आणि ग्राहकांना अन्नसेवा देणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांनी ६ तारखेला हॉटेलची अचानक तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान स्वच्छता आणि अन्न सुरक्षेबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. तपासणी अहवालात हॉटेलला १०६ पैकी केवळ ४८ गुण, म्हणजेच ४६ टक्के गुण मिळाले. अंतिम निष्कर्षात आस्थापनेची स्थिती ‘अनुपालन नाही’ (Non-Compliance) अशी नोंदवण्यात आली.
तपासणीमध्ये हॉटेल परिसरात अस्वच्छता, कीटक प्रतिबंधक उपायांचा अभाव आणि खिडक्या उघड्या असल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आढळली. तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्न, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे ठेवण्याच्या नियमांचे पालन झाले नसल्याचे नमूद करण्यात आले. हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक चाचणी अहवाल किंवा दस्तऐवजी पुरावाही उपलब्ध नव्हता. याशिवाय, अन्न हाताळणारे कर्मचारी आणि वेटर आवश्यक एप्रन, हातमोजे व शिरोवस्त्र वापरत नसल्याचे आढळले. अन्नपदार्थांचे शीतकरण आणि तापमान नियंत्रण, वायुवीजन, वापरलेल्या खाद्यतेलाची पडताळणी तसेच कचरा व्यवस्थापन यामध्येही त्रुटी आढळून आल्या. या त्रुटींमुळे अन्न दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनाच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त (अन्न), परिमंडळ-२, द. वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत परवाना निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. हॉटेल व्यवस्थापनाने सर्व त्रुटी दूर करून अधिकृत पुनर्तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच प्रशासनाचा पुढील लेखी आदेश मिळेपर्यंत अन्न व्यवसाय पुन्हा सुरू करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, अशी माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘क्लिफ ऑल डे डायनिंग’चा अन्न परवाना निलंबित; FDA ची कडक कारवाई
Share Total Views: 2NEWS MARATHWADA | SANDEEP LOKHANDE छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहरातील सातारा परिसरातील चाटे स्कूल रोड येथील ‘मे. क्लिफ ऑल डे डायनिंग बेस्पोक हॉस्पिटॅलिटी एलएलपी’ या हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. Safe Food…
-
ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
Share Total Views: 44बजाज नगर, वाळूज : जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) कार्यालयातर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बजाज नगर, वाळूज येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नेमबाजी, ज्युडो आणि योगा या क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, नेमबाजीतील दोन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय…
-
राजभोग हॉटेलचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत ८८ पैकी केवळ १८ गुण
Share Total Views: 127News Marathwada | Sandeep Lokhande छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील महाराणा प्रताप चौक परिसरातील ‘मे. राजभोग हॉटेल’चा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. ७ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या अचानक तपासणीत हॉटेलमध्ये गंभीर अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी ही…



