
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | (NEWS MARATHWADA)
नवरात्रोत्सवात उपवासासाठी भगर खरेदी करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने केले आहे. भगर आणि उपवासाचे पदार्थ खाताना तसेच त्यांची खरेदी व साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रशासनाने जनजागृती पुस्तिकेद्वारे नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भगरीवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यावर विषद्रव्ये तयार होऊ शकतात. अशी भगर खाल्ल्यास अन्नविषबाधा होण्याचा धोका असतो. विशेषतः तापमान २५ ते ३२ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता असलेले वातावरण बुरशीच्या वाढीस अनुकूल ठरू शकते. त्यामुळे भगर खरेदी करताना आणि वापरताना नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
पाकीटबंद भगर खरेदी करण्याचे आवाहन
बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करावी. शक्यतो पाकीटबंद भगर खरेदी करावी. पाकिटावरील लेबल, पॅकिंग दिनांक आणि ‘बेस्ट बिफोर’ तारीख तपासूनच भगरीचा वापर करावा. भगर साठवताना ओलावा लागू नये, यासाठी ती स्वच्छ आणि कोरड्या डब्यात ठेवावी, अशा सूचना FDA ने दिल्या आहेत.

तयार पीठ खरेदी करणे टाळा
भगरीचे तयार पीठ बाजारातून आणण्याऐवजी आवश्यक तेवढेच पीठ दळून घ्यावे आणि दळलेले पीठ जास्त दिवस साठवून ठेवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच भगरीच्या दशम्या किंवा भाकरीऐवजी खिचडी खाण्याला प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली आहे.
भगर विक्रेत्यांनाही सूचना
भगर विक्रेत्यांनी शक्यतो पाकीटबंद भगरीची विक्री करावी. घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी करताना पावती घ्यावी. पॅकेटवर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक आणि पॅकिंग दिनांक असल्याची खात्री करावी. खुल्या स्वरूपात भगर पिठाची विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुदतबाह्य किंवा कमी दर्जाची भगर विक्रीसाठी ठेवल्यास संबंधित अन्न व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही FDA ने दिला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात नागरिकांनी उपवासाच्या पदार्थांची खरेदी करताना गुणवत्ता आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. FDA ने दिलेल्या सूचनांचे पालन करून संभाव्य अन्नविषबाधेचा धोका टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी.
-
नवरात्रात भगर खाताना सावधान! बुरशीग्रस्त भगरीमुळे अन्नविषबाधेचा धोका; FDA च्या नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Share Total Views: 9छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | (NEWS MARATHWADA) नवरात्रोत्सवात उपवासासाठी भगर खरेदी करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने केले आहे. भगर आणि उपवासाचे पदार्थ खाताना तसेच त्यांची खरेदी व साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रशासनाने जनजागृती पुस्तिकेद्वारे नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अन्न व…
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘क्लिफ ऑल डे डायनिंग’चा अन्न परवाना निलंबित; FDA ची कडक कारवाई
Share Total Views: 5NEWS MARATHWADA | SANDEEP LOKHANDE छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहरातील सातारा परिसरातील चाटे स्कूल रोड येथील ‘मे. क्लिफ ऑल डे डायनिंग बेस्पोक हॉस्पिटॅलिटी एलएलपी’ या हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. Safe Food…
-
ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
Share Total Views: 50बजाज नगर, वाळूज : जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) कार्यालयातर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बजाज नगर, वाळूज येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नेमबाजी, ज्युडो आणि योगा या क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, नेमबाजीतील दोन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय…



