Screenshot

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : पती-पत्नीतील वाद अनेकदा मारहाणीपर्यंत पोहोचल्याच्या घटना समोर येतात. मात्र छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरात घडलेल्या एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पत्नी फोनवर कोणाशी बोलत होती, याचा जाब विचारल्याने संतापलेल्या पत्नीने थेट किचनमधील चाकू उचलून पतीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज महानगर-१ येथील एका फ्लॅटमध्ये राहणारे ३८ वर्षीय पती वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरी करतात. १८ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पती-पत्नी घरी असताना पत्नी तिच्या ओळखीच्या व्यक्तीशी मोबाईलवर बोलत होती. हे लक्षात आल्यानंतर पतीने तिला “तू कोणाशी बोलत आहेस?” असा प्रश्न विचारला.
यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. आरोपानुसार, वाद वाढताच पत्नीने शिवीगाळ करत थेट किचनमध्ये धाव घेतली आणि तेथील चाकू आणून पतीवर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या पतीने स्वतःची सुटका करून घेत थेट वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी जखमी पतीला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी पाठविले. उपचारानंतर पतीने पत्नीविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, कौटुंबिक वादांमध्ये अनेकदा पुरुषांकडून महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात. मात्र या प्रकरणात पत्नीवरच गंभीर आरोप झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. आता या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
॰॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


