
बजाज नगर, वाळूज : जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) कार्यालयातर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बजाज नगर, वाळूज येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नेमबाजी, ज्युडो आणि योगा या क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, नेमबाजीतील दोन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नेमबाजीत ऑर्किड टेक्नो स्कूलचे यश
ऑर्किड टेक्नो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डीएसओ अंतर्गत आयोजित रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. आकांक्षा श्रीपती टकाळे हिने १९ वर्षांखालील मुलींच्या पीप एअर रायफल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. तर प्रज्ञा प्रविण पाटील हिने १९ वर्षांखालील एअर पिस्तूल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक जिंकले. या दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ज्युडो आणि योगामध्येही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्युडो आणि योगा स्पर्धांमध्येही आपले कौशल्य सिद्ध केले. सुवर्ण बाळासाहेब दातरांगे याने राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. तसेच तालुकास्तरीय योगा स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अमर गजानन काळे याने तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळवले. मुलींच्या गटात निशा शिवाजी वाघ हिनेही तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाला आणखी बळ मिळाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आणि मार्गदर्शकांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांमध्येही अशीच यशस्वी कामगिरी करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ऑर्किडच्या विद्यार्थ्यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक होत असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘क्लिफ ऑल डे डायनिंग’चा अन्न परवाना निलंबित; FDA ची कडक कारवाई
Share Total Views: 3NEWS MARATHWADA | SANDEEP LOKHANDE छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहरातील सातारा परिसरातील चाटे स्कूल रोड येथील ‘मे. क्लिफ ऑल डे डायनिंग बेस्पोक हॉस्पिटॅलिटी एलएलपी’ या हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. Safe Food…
-
ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
Share Total Views: 46बजाज नगर, वाळूज : जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) कार्यालयातर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बजाज नगर, वाळूज येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नेमबाजी, ज्युडो आणि योगा या क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, नेमबाजीतील दोन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय…
-
राजभोग हॉटेलचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत ८८ पैकी केवळ १८ गुण
Share Total Views: 130News Marathwada | Sandeep Lokhande छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील महाराणा प्रताप चौक परिसरातील ‘मे. राजभोग हॉटेल’चा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. ७ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या अचानक तपासणीत हॉटेलमध्ये गंभीर अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी ही…



