September 23, 2026
Screenshot

Screenshot


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

परभणी : काळी कमानजवळ, वसमत रोड, परभणी येथील मे. दादा डेअरीची अन्न व औषध प्रशासन, परभणी यांच्या पथकाने तपासणी केली. तपासणीदरम्यान पनीर, म्हशीचे दूध, दही आणि गाईचे दूध असे चार अन्न नमुने अन्न विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. हे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले.

तपासणीमध्ये परवाना, प्रयोगशाळा तपासणी, कॅलिब्रेशन, कीटक नियंत्रण, स्वच्छता तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासह विविध नियमांचे उल्लंघन आढळून आले. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित डेअरीचा परवाना पुढील आदेशापर्यंत तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.

Screenshot

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे आणि तुषार घोपे यांनी केली. सहायक आयुक्त (अन्न) अनंत कुमार चौधरी व पवन कुमार खताळ, तसेच सह आयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Screenshot

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची तपासणी सुरू आहे.

॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!