
छत्रपती संभाजीनगर | वाळूज महानगर परिसरातील सराफ व्यावसायिकांसाठी आज, ९ ऑगस्ट रोजी ‘गेम चेंजर’ सेमिनारचे आयोजन करण्यात आले. वाळूज महानगर सराफ संघटनेच्या वतीने प्रताप चौकातील एका हॉटेलमध्ये या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अंकित वैद्य यांनी सराफ व्यावसायिकांना व्यवसायातील विविध आव्हाने आणि व्यवसायवाढीसंदर्भात मार्गदर्शन केले.
सराफ व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, व्यवसायामध्ये वाढ कशी करावी, नफा कसा वाढवावा आणि बदलत्या बाजारपेठेत व्यवसाय अधिक सक्षमपणे कसा उभा करावा, याबाबत सेमिनारमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, या वेळी उपस्थित सराफ व्यावसायिकांनी व्यवसाय करताना येणाऱ्या विविध अडचणी मांडल्या. त्यामध्ये चोरीच्या घटनांनंतर पोलिसांकडून होणारी चौकशी आणि त्यावेळी व्यावसायिकांवर येणारा कथित दबाव, हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. चोरीच्या प्रकरणांमध्ये योग्य शहानिशा न करता चौकशीच्या नावाखाली व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची काही व्यावसायिकांनी भावना व्यक्त केली.
सराफ व्यावसायिकांच्या समस्या, व्यवसायवाढीच्या संधी आणि भविष्यातील आव्हानांवर या सेमिनारमध्ये चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध सराफ संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने सराफ व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.

या ‘गेम चेंजर’ सेमिनारमुळे सराफ व्यावसायिकांना व्यवसाय अधिक प्रभावीपणे वाढवण्यासाठी तसेच अडचणींवर मार्ग काढण्यासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास उपस्थित व्यावसायिकांनी व्यक्त केला.
॰॰॰॰॰॰
-
छत्रपती संभाजीनगरात फार्मासिस्ट दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली
Share Total Views: 6 छत्रपती संभाजीनगर, २७ सप्टेंबर : जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मसी
-
डीजेमुक्त बजाजनगरमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप; आकर्षक देखाव्यांसह विसर्जन मिरवणूक
Share Total Views: 7 वाळूज महानगर : दरवर्षीच्या तुलनेत यंदा बजाजनगरातील गणपती विसर्जन मिरवणुकित डीजेचा
-
विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा सोन्याच्या दागिन्यांवर डोळा; बजाजनगरमध्ये महिलेचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 37 वाळूज महानगर : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील



