
वाळूज महानगर : भीषण अपघातात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या मयताच्या वडिलांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मकरंद संजय जाधव (वय 22) याचा ३ ऑक्टोबर रोजी भीषण अपघातात मृत्यू झाला. अपघात एवढा भयानक होता की, दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती.
मात्र, मकरंदचा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचा आरोप त्याचे वडील संजय लक्ष्मण जाधव यांनी केला. याप्रकरणी घातपाताचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती. दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना संजय जाधव यांचा संताप अनावर झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. तसेच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याची धमकी देत पोलिसांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याचवेळी पोलीस ठाण्यातील खिडकीची काच फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी आबासाहेब केशवराव फलके यांच्या फिर्यादीवरून मयत मकरंद जाधव यांचे वडील संजय लक्ष्मण जाधव यांच्याविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मकरंद जाधव यांचा मृत्यू नेमका अपघात होता की घातपात, याबाबत वडिलांनी केलेल्या आरोपांचीही पुढील तपासात पडताळणी होणार आहे.
********************
-
जंतर-मंतर आंदोलनावरून अभिजीत दिपके आक्रमक; पोलिसांच्या नोटिसांवर सवाल, “कार्यकर्त्यांना त्रास देण्यापेक्षा मला अटक करा”
Share Total Views: 43,586 छत्रपती संभाजीनगर : नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे १० ऑक्टोबर रोजी प्रस्तावित
-
मयताच्या वडिलांवरच गुन्हा दाखल; घातपाताच्या आरोपानंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गोंधळ
Share Total Views: 45,448 वाळूज महानगर : भीषण अपघातात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर हा अपघात नसून
-
मे. दादा डेअरीचा परवाना निलंबित; तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळल्याने कारवाई
Share Total Views: 18 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा परभणी : काळी कमानजवळ, वसमत रोड, परभणी येथील



