July 7, 2025
e83c0a95-b9ba-45cd-aff3-1f9f7b1a079c-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे )

गंगापूर – आज गंगापूर तालुक्यातील मौजे शेंदूरवाडा (गट नं. 100) येथील गायरान जमिनीवर अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. तहसीलदार नवनाथ वगवाड व वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई पार पडली.

सदर ठिकाणी 2 जेसीबी, 2 हायवा व 1 आयशर टेम्पो अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करताना आढळून आले. संबंधित सर्व वाहने ताब्यात घेऊन तहसिल कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

ही कारवाई करताना PSI शितोळे, PSI वाघ, PSI राठोड यांच्यासह मंडळ अधिकारी शेंदूरवाडा हुग्गे, तसेच ग्राममहसूल अधिकारी कराळे हे उपस्थित होते.

या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या या पावलाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

***


error: Content is protected !!