July 7, 2025
Screenshot

Screenshot


Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर (वाळूज महानगर ) (दि. २० जून) – बनकरवाडी परिसरात अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या आरोपीवर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी कारवाई करत १५ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुरुवारी सकाळी ९.२० वाजता मिराबाई आव्हाड यांच्या भाजीपाल्याच्या दुकानाजवळ करण्यात आली. यावेळी आरोपी द्वारकादास बाबुराव जोगदंड (रा. हनुमान नगर, वडगाव) हा १५ देशी दारूच्या बाटल्या (प्रत्येकी १८० एमएल) एका पिवळ्या रंगाच्या गोणीत बेकायदेशीरपणे साठवून विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे आढळून आले. दारू “भिंगरी संत्रा लाल-पिवळे लेबल” या प्रकाराची असून, एकुण किंमत १०५० रुपये एवढी आहे.

या प्रकरणी फिर्यादी पोलीस अंमलदार सुरजकुमार जिवन अग्रवाल (वय ३७, पो.अं. ब.न. ५८, पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज) यांच्या तक्रारीवरून कलम ६५(ई), ८१, ८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोनी रामेश्वर गाडे याच्या मार्गदर्शनाखाली सपोनी मनोज शिंदे व त्यांच्या टीमने केली. प्रकरणाचा तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहे.

पोलिसांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे परिसरात अवैध दारू विक्रीचे मोठे प्रमाण रोखण्यात मदत झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!