July 7, 2025
img_9561-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे

वाळूज महानगर, २२ जून — वाळूज औद्योगिक परिसरातील साजापूर येथे मागील काही दिवसांपासून विविध तपास पथकांकडून सुरू असलेल्या धाडसत्रात अजून एका गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकून महत्त्वपूर्ण सामग्री हस्तगत केली आहे.

२० जून रोजी एनडीपीएस पथकाने स्क्रॅपच्या नावाखाली औषधनिर्मितीसाठी वापरले जाणारे संशयित पावडर वाहतूक करत असलेली दोन वाहने ताब्यात घेतली होती. पोनी.गीता बागवडे व त्यांच्या टीमनेसह सपोनि. मनोज शिंदे यांचेकडून यावेळी दोन गोडाऊन सील करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सील केलेल्या गोडाऊनच्या बाजूलाच असलेल्या “डिलक्स स्क्रॅप” नावाच्या आणखी एका गोडाऊनवर धाड टाकली.

छाप्यात पोलिसांनी टॅबलेट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉकेट स्ट्रिप्स जप्त केल्या आहेत. सदर गोडाऊनमध्ये आणखी काही संशयित साहित्य आढळून येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दरम्यान, शहरात वाढत असलेल्या अवैध धंद्यांविषयी न्यायालयाने स्वतःहून (सु॑मोटो) दखल घेतली असून, त्यानंतर पोलिसांची हालचाल अधिक गतीमान झाली आहे. या पृष्ठभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईची चक्र वेगाने फिरवली आहेत.

शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारचे अवैध व्यवहार सुरू असल्याची माहिती नागरिकांकडून समोर येत असून, संबंधित ठिकाणीही कारवाई करण्याची मागणी जोर धरू अगला आहे.

**


error: Content is protected !!