
वाळूज महानगर ( न्यूज मराठवाडा वृत्तसेवा):- अनिकेत घोडके
१३ जून – वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्रमुख महामार्गांवर आज झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. परिणामी संपूर्ण महामार्गाने तळ्याचे स्वरूप धारण केले असून, वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आज सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी व्यवस्थेचा अभाव स्पष्ट दिसून आला. विशेषतः मोटारसायकलस्वारांनी मोठ्या पाण्याचा प्रवाह पार करताना धोका पत्करावा लागत आहे. अनेक वाहनांचे इंजिन बंद पडल्याने वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वारंवार अशा परिस्थिती निर्माण होत असूनही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे.
- धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
- ‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- कृष्णा ऑप्टिकलकडून, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!