July 7, 2025
6441c2de-53e8-424d-af7e-60ca0cb12752

प्रसिद्ध बिझनेस ट्रान्सफॉर्मर स्वप्निल गीते यांचे प्रभावी मार्गदर्शन; 180 उद्योजकांनी घेतला नवचैतन्याचा अनुभव

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर (13 जून) :
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (MASSIA) च्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत ‘Business चा CHAMPION’ हा विशेष सेमिनार 11 जून रोजी मसिआच्या वाळूज येथील अनिल विश्वासराव चव्हाण सभागृहात पार पडला.

या सेमिनारमध्ये सुप्रसिद्ध बिझनेस ट्रान्सफॉर्मर कोच श्री स्वप्निल गीते यांनी उपस्थित उद्योजकांना टीम मॅनेजमेंट, सेल्स स्ट्रॅटेजी, योग्य भरती धोरणं, प्रभावी कार्यपद्धती व नेतृत्वगुणांवर अत्यंत साध्या, खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसिआचे अध्यक्ष श्री अर्जुन गायकवाड होते. त्यांनी यावेळी सांगितले की, “उद्योजकांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अशा प्रेरणादायी सेमिनार्स अत्यावश्यक आहेत. अशा उपक्रमांतून नव्या कल्पना, नवसंजीवनी व उद्योजकतेला दिशा मिळते.”

सेमिनारचे प्रास्ताविक श्री मंगेश निटूरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शनही त्यांनीच निभावले.
मसिआ पदाधिकारी श्री मनिष अग्रवाल, श्री दिलीप चौधरी, श्री रमाकांत पुलकुंडवार, श्री सर्जेराव साळुंके, श्री संदीप जोशी, श्री कमलाकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूण 180 उद्योजकांनी सहभाग नोंदवलेल्या या कार्यक्रमात अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या की, “हे एक ट्रेनिंग नव्हते, तर आमच्या व्यवसायातील एक ‘टर्निंग पॉइंट’ ठरले.”
कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि ऊर्जायुक्त वातावरणात पार पडला.

मसिआमार्फत अशा कार्यशाळा उद्योजकांसाठी नवी दृष्टी, आत्मभान आणि यशाचा मार्ग घडवणाऱ्या ठरत आहे.

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!