July 7, 2025
6524e6c6-e109-403b-95ee-906df7eb49c4

छत्रपती संभाजीनगर | १३ जून :न्यूज मराठवाडा प्रतिनिधी ( संदीप लोखंडे ) –
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि छ. संभाजीनगरचे पालकमंत्री संजय पांडुरंग सिरसाट यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे दलित समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.

विवादग्रस्त पत्रकार परिषद – ‘हरिजन’ शब्दाचा सातत्याने वापर
दुपारी ३ ते ४ च्या सुमारास अलंकार हॉटेलजवळ झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जलील यांनी “हरिजन समाजासाठी जागा राखीव आहे का?”, “हरिजन म्हणजे कोण?” आणि “महार हाडोळा, महार इनामी वतन” अशा प्रकारचे वक्तव्य सातत्याने करत समाजाच्या भावना दुखावल्या. उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुमारे सात ते आठ वेळा “हरिजन” हा अपमानास्पद शब्द वापरून मंत्री संजय सिरसाट यांचा उद्देशून उल्लेख केला.

“हरिजन’ हा कायदेशीरदृष्ट्या अमान्य शब्द
संविधानप्रेमी आणि दलित कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “हरिजन” हा कायद्यानुसार अमान्य शब्द असून, देशाच्या कोणत्याही अनुसूचित जाती-जमातीच्या यादीमध्ये याचा उल्लेख नाही. महात्मा गांधी यांनी वापरलेला हा शब्द आज अनेक राज्यांत अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा ठरतो. त्यामुळे सार्वजनिकरीत्या वापर झाल्यास कारवाई शक्य आहे.

समाजावर अन्याय – गुन्हा दाखल करण्याची मागणी
या वक्तव्यामुळे फक्त मंत्री सिरसाट यांचा नव्हे, तर संपूर्ण दलित-महार समाजाचा अपमान झाला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “ज्याच्याकडे मालमत्ता असावी, ती फक्त सवर्ण समाजानेच घ्यावी, दलितांनी घेऊ नये” — असा पूर्वग्रह दाखवून इम्तियाज जलील यांनी घृणास्पद आणि विघटनकारी वक्तव्य केले आहेत.

गुन्हा दाखल करण्याची मागणी
यासंदर्भात, अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार डॉ बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार कृती समितीकडून करण्यात आली आहे.

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!