

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात देश विघातक कार्य सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे. यात छत्रपती संभाजीनगर व जालना शहरातून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) व दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी रात्री ही मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे जालना व संभाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) व दहशतवाद विरोधी पथकाने रात्री एकाचवेळी शहरात, जालना व मालेगाव अशा तीन शहरात छापे टाकले. यात छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौक व एन -६ परिसरातून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर जालन्यातील गांधीनगर भागातून एकाला ताब्यात घेतले आहे. या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांचा पंचनामा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर मधील दहशतवादी कारवाईत हे आरोपी सहभगी असल्याची माहिती आहे. तसेच जालना व संभाजीनगर शहरातील मुख्य वसाहतीतून सदर आरोपी ताब्यात घेतले असल्याने शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
—-

——