

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
सोयगाव : आक्षेपार्ह रील व्हायरल केल्याने मोठा जमाव शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रात्री उशिरा पोलीस ठाण्यासमोर जमला. रील व्हायरल करणाऱ्या तरुणाविरुद्ध कारवाईची मागणी जमावाने केली. त्यानंतर शेख जहीर शेख सुलतान या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

इन्स्टाग्रामवर दोन धर्मांत तेढ निर्माण करणारी रील शुक्रवारी रात्री दहाला व्हायरल झाली होती. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. धार्मिक भावना दुखावल्याने नागरिकांचा मोठा जमाव सोयगावच्या पोलीस ठाण्यासमोर जमला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड ग्रामीण पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून घेतली. यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले. रात्री अकराला सुनील गावंडे यांच्या तक्रारीवरून शेख जहीर शेख सुलतान या तरुणाविरुद्ध रील टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले
———
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न