न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
छत्रपती संभाजीनगर : शहरात अनेक कॅफेच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम करून त्या ठिकाणी लहान मुला मुलींना, शाळेय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी, एकांत मिळण्यासाठी कॅफेचालक हे कम्पार्टमेंट तयार करून जागा उपलब्ध करून देत आहेत व त्या ठिकाणी गैरप्रकार होत आहेत, अश्या तक्रारी प्राप्त झालेले होत्या. त्या अनुषंगाने प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांपासून या संवेदनशील विषयावर काम चालू होते. त्या अनुषंगाने 29 कॅफे पोलिसांकडून आयडेंटीफाय करण्यात आले होते.
दिनांक ५ आज रोजी पोलीस आयुक्त सो, छत्रपती संभाजीनगर शहर प्रवीण पवार यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, महानगरपालिका आयुक्त संतोष वाहुळे यांच्यासह यांच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा ) संदीप गुरमे, गीता बागवडे यांचे कडून संयुक्तरित्या शहरातील 29 कॅफेवर कारवाई करून कॅफेमध्ये तयार करण्यात आलेले कम्पार्टमेंट तोडण्यात आले.
——
-
पश्चिम मतदार संघातील बजाजनगर येथे झालेल्या गदारोळा प्रकरणी राजू शिंदेसह ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
-
खबरदार, मतदान केंद्र परिसरात मोबाइल न्याल तर होईल गुन्हा दाखल
-
संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवर दगडफेक; मित्र किरकोळ जखमी
-
कालीचरण महाराज प्रकरणानंतर शिरसाट मनोज जरांगेंच्या भेटीला